आजच्या काळात तुम्ही पाहत असाल आधार कार्ड सर्वात महत्त्वाची कागदपत्र बनलेले आहे. यापूर्वी आधार कार्ड पेपर होते परंतु भारतीय विशेष ओळख प्राधिकरणने ऑक्टोबर 2020 मध्ये आधार कार्ड चा नवा प्रकार सादर केलेला होता. त्यानंतर यूआयडीएआय आता नवीन आधार कार्ड सुद्धा बनवत आहे
PVC आधार कार्ड ची वैशिष्ट्ये कोणती?
PVC आधार कार्ड हे अधिक टिकाऊ आणि तुम्हाला कुठेही नेण्यास अत्यंत सोपे आहे हे कार्ड तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये एटीएम किंवा डेबिट कार्ड सारखे सहज ठेवता येऊ शकते. पीव्हीसी आधारित आधार कार्ड पूर्णपणे हवामान सुरक्षित आहे हे दिसायला सुद्धा अत्यंत आकर्षक आहे आणि लॅमिनेटेड सुद्धा आहे.
PVC आधार कार्डची मागणी कशी करायची खाली दिलेल्या Steps फॉलो करा.
तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा UIDAI वेबसाईटवर जावे लागेल नंतर My Aadhaar या विभागात गेल्यानंतर Order Aadhar PVC Card क्लिक करा.
पुढे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी वर्चुअल आयडी किंवा 28 अंकाचा आधर नोंदणी आयडी प्रविष्ट करावा लागेल.
तुम्हाला आता तिथे खाली दिलेल्या बॉक्समध्ये सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड भरावा लागेल आणि ओटीपीसाठी सेंडओटीपी/OTP वर क्लिक करा.
यानंतर पुढे तुम्हाला दिलेल्या जागेत नोंदणीकृत मोबाईल नंबर वर प्राप्त ओटी भरा आणि सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या PVC आधार कार्डचे प्रिव्यु पुढे दिसेल.
नंतर खाली दिलेल्या पेमेंट Payment पर्यायावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला पेमेंट पेज वर जा, तुम्हाला येथे 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुमची पेमेंटची प्रक्रिया झाल्यावर आपल्या आधार कार्डची ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
ही सर्व प्रकारची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे PVC आधार कार्ड प्रिंट करून पाच दिवसांच्या आत भारतीय पोस्टाला पाठवेल. जेथून हे आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचेल.