Monday, October 2, 2023
Homenewsआधार कार्ड वरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीचे आहे या कागदपत्रांद्वारे करा अपडेट

आधार कार्ड वरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीचे आहे या कागदपत्रांद्वारे करा अपडेट

आधार कार्ड वरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीचे आहे करा या कागदपत्रांद्वारे अपडेट

आधार कार्ड बहुतांश ठिकाणी वैद्य आहे पण अनेक लोकांना आधार वर घरचा पत्ता किंवा जन्मतारखेत काही चूक असणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते मात्र आता आपल्याला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही.

Aadhar Card Update 

आज काल जवळ जवळ प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आधार कार्ड अनेक ठिकाणी वैद्य आहे पण अनेक लोकांना आधार वर घराचा पत्ता किंवा जन्मतारखेत काही चूक असते अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.मात्र आता आपल्याला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.तुम्ही ते एकदम सोप्या पद्धतीने अपडेट करू शकता.आधार कार्डवर जन्मतारीख किंवा घराचा पत्ता अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे दिल्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता किंवा जन्मतारीख अपडेट करू शकता. (Is the address for date of birth on Aadhar Card wrong update through this document)



जन्मतारीख अपडेट करण्यासाठी 

जर तुम्हाला तुमची जन्मतारीख अपडेट करायचे असेल तर तुम्हाला आम्ही सांगू की यासाठी तुम्हाला एकूण 15 प्रकारची कागदपत्रे वैद्य आहेत ते पुढील प्रमाणे
  1. जन्म प्रमाणपत्र 
  2. SSLC पुस्तक किंवा प्रमाणपत्र 
  3. पासपोर्ट 
  4. UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपात गट A राजपत्रित अधिकारी यांनी जारी केलेल्या जन्मतारखेचे प्रमाणपत्र 
  5. शासकीय प्राधिकरणाने जारी केलेले दुहेरी स्वाक्षरी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र ज्यामध्ये छायाचित्र आणि जन्मतारीख आहे 
  6. जन्मतारीख असलेल्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने दिलेला फोटो आयडी 
  7. पॅन कार्ड 
  8. कोणत्याही शासकीय मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट 
  9. जन्मतारीख असलेले शासकीय फोटो ओळखपत्र 
  10. केंद्रीय किंवा राज्य पेन्शन पेमेंट ऑर्डर 
  11. केंद्र सरकारची आरोग्य सेवा योजना फोटो कार्ड
  12. शाळा सोडल्याचा दाखला किंवा नाव आणि जन्मतारीख असलेला शाळा हस्तांतरण प्रमाणपत्र
  13. शाळेच्या मुख्याध्यापकाने जारी केलेले शाळेचे रेकॉर्ड मध्ये नाव जन्मतारीख आणि छायाचित्र आहे 
  14. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेद्वारे UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपात नाव, जन्मतारीख आणि छायाचित्रासह जारी केलेले ओळख प्रमाणपत्र
  15. नाव, जन्मतारीख आणि छायाचित्रासह UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपनावर EPFO द्वारे जारी केलेले ओळख प्रमाणपत्र

घरचा पत्ता अपडेट करण्यासाठी

जर तुम्हाला घराचा पत्ता अपडेट करायचा असेल तर खाली सांगितलेली एकूण 45 कागदपत्रे वैद्य आहेत यापैकी काही महत्त्वाचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
  1. पासपोर्ट 
  2. बँक स्टेटमेंट पासबुक 
  3. पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट पासबुक 
  4. रेशन कार्ड 
  5. वोटर आयडी 
  6. ड्रायव्हिंग लायसन्स 
  7. सरकारी फोटो आयडी कार्ड किंवा पीएसयुद्वारे जारी सर्विस फोटो आयडी कार्ड
  8. विज बिल तीन महिन्यांपेक्षा जुने नको 
  9. पाणी बिल तीन महिन्यांपेक्षा जुने नको 
  10. टेलिफोन लँडलाईन तीन महिन्यांपेक्षा जुने नको
  11. प्रोपर्टी टॅक्स रिसिप्ट तीन महिन्यांपेक्षा जुने नको
  12. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तीन महिन्यांपेक्षा जुने नको
  13. इन्शुरन्स पॉलिसी 
  14. NREGSजॉब कार्ड 
  15. आर्म्स लायसन्स 
  16. पेंशनर कार्ड
  17. फ्रीडम फायटर कार्ड 
  18. किसान पासबुक 
  19. CGHS/ECHS कार्ड
  20. इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर 
  21. व्हिकल रजिस्ट्रेशन नंबर 
  22. रजिस्टर्ड सेल किंवा लीज किंवा रेंट ॲग्रीमेंट
  23. फोटोसह टपाल खात्याने जारी केलेले ॲड्रेस कार्ड 
  24. छायाचित्रासह राज्य सरकारने जारी केलेले जात आणि अधिवास प्रमाणपत्र
Is the address for date of birth on Aadhar Card wrong update through these documents
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments