आजचे राशिभविष्य 18 सप्टेंबर 2021 : Today’s horoscope 18 September 2021

आजचे राशिभविष्य 18 सप्टेंबर 2021/Today’s horoscope 18 September 2021

मेष :
माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका ठरवलेले विचार अचानक बदलू नका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल परदेश कंपनीकडून लाभाचे योग उत्पन्नात वाढ होईल.
वृषभ :
हातातील कामाला यश लाभेल शेजाऱ्यांची मदत घेता येईल धनवृद्धी चे योग जुळून येतील कौटुंबिक सौख्यात वाढ होईल आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
मिथुन :
रद्दनवीन कामात हात घालू शकता वडिलोपार्जित मालमत्तेतुन लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे मनोबल वाढीस लागेल.
कर्क :
काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसऱ्यांच्या स्वभावातील दोष देऊ नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींच्ये अमूल्य सहकार्य लाभेल. कार्यशक्तीचे कौतुक केले जाईल.
सिंह :
इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल.
कन्या :
आजूबाजूचे धुर्त लोक ओळखून राहा. लपवाछपवीच्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका.
तुळ :
स्वतःच्या मतावर ठाम राहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल.
वृश्चिक :
आग्रहाला बळी पडू नका. मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तू खरेदी करताना चोखंदळ राहा. अन्यथा नुकसान संभवते.
धनु :
विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्‍न प्राधान्याने सोडवा.दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका.
मकर :
नवीन कामात आळस करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पहावी जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरूपात बदल संभवतो.
कुंभ :
मनातील विचार बोलून दाखवा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टीकडे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभवार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा.
मीन :
इतरांचे प्रेम संपादन करा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात या मुलांना नवीन संधी लाभू शकते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment