अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी
शेतकऱ्यांनी भरलेले माहितीही सातबाऱवर आता येणार
चला तर आता थोडा वेळ न दडवता जाणून घेऊयात की पिक पाहणी एप्लीकेशन चा उपयोग करून शेतातील पिकांचे झाडांची नोंद सातबारावर कसे करावे शेतकरी बंधूंनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला अगदी योग्य पद्धतीनेेबिनचूक माहिती या ठिकाणी भरायचे आहे कारण या सर्व बाबी तुमच्या सातबार्यावर नोंदविला जाणार आहेत.
ई पीक पाणी मोबाईल ॲप
इन्स्टॉल करण्याची पद्धत खालीलप्रमाणे
- तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सुरू असल्याची खात्री करा.
- मोबाईल मधील गुगल प्लेस्टोर उघडा.
- गुगल प्ले स्टोअर च्या सर्च बार मध्ये हा e peek pahani कीवर्ड टाका.
- e peek pahani हा शब्द टाकल्यावर अनेक मोबाईल ॲप्लिकेशन तुम्हाला दिसतील त्यापैकी ज्या ॲप्लिकेशनवर department of revenue Government of Maharashtra असे लिहिलेले असेल त्या ॲप्लिकेशनवर टच करा हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होण्यास सुरुवात होईल आणि मोबाईल ॲप इन्स्टॉल झाल्यावर पुढील प्रोसेस.
E peek pahani हे ॲप्लिकेशन पूर्णपणे इंस्टॉल झाल्यावर ओपन करा.
- E peek pahani application ओपन होत असताना या ठिकाणी काही सूचना दिसेल त्या वाचून घ्या
- सर्व सूचना वाचल्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा अशी सूचना त्याखाली एक चौकट दिलेली असेल त्या चौकटीमध्ये तुमच्या सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर टाका व पुढे या बटनावर टच करा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका व गाव दिलेल्या यादीतून एवढा सर्व माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर पुढे या बटनाला टच करा
- जसे तुम्ही पुढे या बटनावर टच करा त्यानंतर याठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनी संदर्भातील माहिती भरावी लागणार आहे.
- खातेदार निवडण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय या ठिकाणी दिसेल जसे की पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक व गट क्रमांक यापैकी एक कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता.
- खातेदार निवडण्यासाठी शक्यतो पहिले नाव भरावे दिलेल्या चौकटीमध्ये मराठी भाषा मध्ये तुमचे नाव टाइप करा आणि शोधा या बटनावर टच करा.
- खातेदार निवडा या बटनावर टच करताच तुमच्या नावासारखे अधीक खातेदाराची यादी तुम्हाला दिसेल त्या पैकी तुमचे तुमच्या नावाच्या खात्यावर टच करा आणि पुढे या बटणावर क्लिक करा.
- ई पीक पाहणी एप्लीकेशन मधील नोंदणी अर्ज प्रक्रिया समजावून घेऊया तुमच्या नावाच्या खाली तुमच्या खात्याचा नंबर या ठिकाणी आलेला असेल त्या चौकटीत क्लिक करा आणि पुढे या बटनाला टच करा.
- आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे आपणाला मोबाइल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदल या बटनावर टच करा.
- तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा नसल्यास पुढे या बटनावर टच करा.
- जसी ही तुम्ही पुढे या बटनाला टच कराल त्यावेळी एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर पाठविला जाईल तो ओटीपी दिलेल्या चौकटीतच टाका आणि संकेतांक भरा या बटनाला टच करा.
- अशा पध्दतीने ई पीक पाहणी ऍप्लिकेशन नोंदनी अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला एक dashboard दिसेल यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की,
- परिचय
- पिकांची माहिती
- कायम पड नोंदवा
- बांधावरची झाडे नोंदवा
- पीक माहिती मिळवा
- परिचय यांनी बटनाला टच करुन तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरू शकता. तुमचा फोटो देखील अपलोड करू शकता.