अनारसे रेसिपी स्वादिष्ट अनारसे कसे बनवाल पहा इथे How to make delicious anarase
दिवाळीमध्ये करा एकदम मस्त पैकी अनारसे स्पेशल रेसिपी बनवणे हा एक रिवाज आहे. प्रत्येक क्षणाची काही पेशल रेसिपी असते त्यात दिवाळी म्हणलं की मग तर काय विचारायचं नाही तर आज आपण स्वादिष्ट अनारसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. दिवाळीमध्ये करंजी, चकली, शंकरपाळे, कापण्या, अनारसे, बाकरवडी अशा अनेक रेसिपींची मेजवानीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील म्हणजेच आज महाराष्ट्रातील खास अनारसे रेसिपी पाहूया..
चकली बनवण्यासाठी साहित्य
- एक कप तांदूळ
- एक कप किसलेला गूळ
- एक चमचा खसखस
- तळण्यासाठी तेल
- तूप
चकली बनवण्यासाठी ची कृती
- सर्वात पहिल्यांदा तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावे. पण प्रत्येक दिवशी पाणी बदलून घ्यावे.
- चौथ्या दिवशी चाळणीत पाणी निथळण्यासाठी ठेवावे. नंतर ते तांदूळ पंचा घेऊन कोरडे करून घ्या.ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पुन्हा ते पीठ चाळून घ्या.
- त्या तांदळाच्या पिठात एक चमचा तूप घालून घट्ट मळून घ्या. हा घट्ट झालेला पिठाचा गोळा किमान सहा दिवस बंद डब्यात घालून ठेवा.
- लक्षात ठेवा प्लॅस्टिकचा डबा वापरा. हे पिठ देखील प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून डब्यात घाला.
- सहा दिवस उलटून गेले की हे पीठ बाहेर काढा. मध्यम गॅसवर तेल किंवा तूप गरम करा. सुपारीच्या आकाराचे पीठाचे गोळे करून घ्या. नंतर पुरी इतक्या आकाराचे लाटून घ्या, लाटताना पुरी खसखसीवर लाटा .
- लाटल्यानंतर ज्या भागाला खसखस लावलेली ती पाच वर ठेवा आणि तळत असताना पुरीची बाजू पलटू नका. याचा फायदा असा की, खसखस कळत नाही.
- ती पुरी टाकली की फुलते आणि पसरट होते. त्यामुळे झारा तेलातील पुरीवर कडेने धरावा म्हणजे पुरी तुटत नाही.
- समजा अनारसे तळताना खूप वेळा हा प्रयोग होत फसतो.तर त्या वेळी हे पीठ डब्यात भरुन घ्यायचं नंतर त्या पिठाचे अनारसे करता येतात. कारण हे पीठ पाच – सहा दिवसांनंतरही सहज टिकते.
- मध्यम गॅसवर अनारसे ला सोनेरी रंग मिळेपर्यंत तळावेत. तळल्यानंतर ते चाळणीत घालुन तेल निथळून घ्यावे. अशा प्रकारे गोड अनारसे तयार झालेले आहे.
तर तुम्ही दिवाळीनिमित्त मस्तपैकी खा गोड अनारसे.