गेल्या वर्षी पद्मश्री मिळालेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) या 75 वर्षांच्या होत्या त्यांना येथील गॅलक्सी केअर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
अनाथ मुलांची आई म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.Sindhutai Sapkal passed away
गेल्या वर्षी पद्मश्री मिळालेल्या सपकाळ या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना येथील गॅलक्सी केअर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
दीड महिन्यापूर्वी सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal death)यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि बरा होण्याचा वेग खूपच मंदावला होता. आज रात्री आठच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितले.
गरिबीत वाढलेल्या सिंधुताई सपकाळ लहानपणीच अपार कष्ट सोसावे लागले, त्यांनी अनाथ मुलांसाठी संस्था सुरू केल्या. त्यांनी 40 वर्षात एक हजाराहून अधिक अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांची काळजी घेतली. Sindhutai sapkal known as orphan childrens mother dies