कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार Karjat Jamkhed MLA Rohit Pawar हे कोव्हिड पॉझिटिव्ह आले असून याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिलेली आहे.
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म द्वारे म्हटले आहे की तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्ष त्याला हुलकावणी देत होतो पण अखेर त्याने मात्र मला गाठलंच माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली पण आपण आशीर्वाद असल्याने काळजीच काही कारण नाही माझ्या संपर्कात आलेल्यानी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे आल्यास तातडीने उपचार घ्यावेत.
कर्जत जामखेड चे आमदार यांनी आज दुपारी बारा वाजता कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील चार जागांसाठी उमेदवारी भरण्यासाठी कार्यकर्त्यांसह संत श्री गोदड महाराज मंदिरात उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेऊन आरती समाप्ती केली होती. मात्र याशिवाय शाळांना टॅब वाटप कार्यक्रमा सही उपस्थित होते. त्यामुळे आज कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व शिक्षक संपर्कात आले असण्याची शक्यता असून अशा सर्वांना काळजी घेऊन तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2022