News: गेल्या काही दिवसांपासून टेल्साचे सीईओ इलॉन मस्क Twitter विकत घेण्या वरून चर्चा वाढल्या होत्या.
अखेर शेवटी ट्विटर या कंपनीने इलॉन मस्क यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार केल्याने आता 44 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपये किमतीला मस्क यांनी ट्विटर खरेदी केलेले आहे. शेवटी त्यांनी असे सांगितले की ट्विटर खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी सुरक्षित करत असल्याचे मस्क यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. फिटर न हा व्यवहार पक्का केला असून यावर्षी ही डील पूर्ण होईल असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यामुळे आता ट्विटर एक प्रायव्हेट कंपनी असेल त्याचे मालक इलॉन मस्क हे असतील.
तसेच इलाॅन मस्क Elon Musk यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्ज डॉलर देण्याची ऑफर दिलेली होती परंतु यावरून बराच वाद झालेला होता. मात्र एका अहवालानुसार त्यांच्यासोबत हा करार करण्याची तयारी करत होते. मस्क यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर कंपनी आणखी चांगल्या ऑफरचा शोध घेत होती. परंतु मस्क यांना ट्विटर मिळवण्यात यश मिळालं.